कोथिंबीर १८ हजार रुपये शेकडा बाजारभावाने विक्री

परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे पिकांचे खूप नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा फटका हा सर्व प्रकारच्या शेतमालावर जाणवला आहे. परतीच्या पावसाने शेतातील उभे पीक नाश पावल्याने पालेभाज्या आवक घटली आहे. आवक घटल्यामुळे बाजारभाव टिकून आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्याने पालेभाज्या दर टिकून आहे.

पालेभाज्या दर टिकून असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दोन वेळच्या जेवणात लागणारा भाजीपाला खरेदीसाठी खिशाचा विचार करावा लागत आहे. मंगळवारी (दि.१२) कोथिंबीरला १८ हजार रु पये शेकडा, तर कांदापात साडेपाच हजार आणि मेथी ४२०० व शेपू तीन हजार रुपये बाजारभावाने विक्री झाली. पालेभाज्यांचे दर खूप तेजित आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पालेभाज्या खरेदीसाठी खिशाला आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.मंगळवारी बाजारसमितीत विक्रीला आलेल्या कोथिंबीरच्या प्रति जुडीला १८०, तर कांदापात ५५, मेथी ४२ आणि शेपू ३० रु पये दराने विक्री झाल्याचे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

प्रवाशांसाठी खुशखबर ; मुंबई-पुणे मार्गावर धावणारी शिवनेरी व अश्वमेध बसच्या दरात भरगोस कपात

जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी अनेक प्रकल्पांना चालना – गिरीष महाजन

अस्मानी संकट, नैराश्य आणि कर्जबाजारीपणामुळे महिनाभरात ५९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कृषी सहायकांच्या रिक्‍त पदांमुळे वाढली कृषी विभागाची कसरत