केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किंमतीमध्ये वाढ केल्यामुळे शेतकर्‍यांना मिळाला दिलासा

केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. यंदाच्या हंगामासाठी मध्यम व लांब धाग्याच्या कापसासाठी अनुक्रमे प्रतिक्विंटल ५२५५ व ५५५० रुपये आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे केवळ १०५ व १०० रुपयांची वाढ मिळाली आहे. २०१९-२०२० सालची ‘एमएसपी’ जाहीर करण्यात आली. गेल्या खरीप हंगामात (२०१८-१९) मध्यम व लांब धाग्याच्या कापसाच्या आधारभूत किमतीत आधीच्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येकी ११३० रुपयांची वाढ करण्यात आली होती. यंदा मात्र कापसाला किरकोळ वाढ मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत खरीप पिकांच्या किमतीत ‘एमएसपी’ वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. ‘एमएसपी’ जाहीर करताना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे सूत्र सरकारने कायम ठेवले आहे. खरीपाच्या  सर्वच पिकांच्या आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्यात आल्याचे  कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले.

भात हे खरीपातील प्रमुख पीक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाताच्या आधारभूत किमतीत ६५ रुपये वाढ केली आहे. भाताच्या सर्वसाधारण पिकासाठी 1815 रुपये प्रतिक्विंटल एमएसपी मिळेल तर ‘ए’ ग्रेडसाठी १८३५ दर आहे. ज्वारीच्या आधारभूत किमतीमध्ये प्रतिक्विंटल  रुपये वाढ केली आहे.

सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ३७४८ रुपये आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ३११ रुपये वाढ मिळाली आहे. तूर, मूग आणि उडीद यांच्या आधारभूत किमती अनुक्रमे ५८००, ७०५० आणि ५७०० रुपये जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२५, ७५ आणि १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या पिकांना अनुक्रमे २२५, १४०० आणि २०० रुपयांची वाढ मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने खरीप पिकांच्या आधारभूत किमतींना मंजुरी दिली.

महत्वाच्या बातम्या –

तिवरे धरणफुटीबाबत एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई – गिरीष महाजन

अर्थसंकल्प : सरपंचाना येणार अच्छे दिन, मानधनात वाढ करण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद