शेतकऱ्यांना आता थेट गोदामांतून करता येणार आपल्या मालाची देशभर कोठेही विक्री

शेतकऱ्यांना आता थेट गोदामांतून आपल्या मालाची देशभर कोठेही विक्री करता येणार आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केट (इ-नाम) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या शेतमालाची खरेदी-विक्री करण्याची तयारी सुरू केली आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गोदामांतील शेतमालाचा आंतरराज्यीय (राज्या-राज्यांमध्ये) आणि राज्यांतर्गत (राज्यातील विविध ठिकाणी) व्यापार लवकरच सुरू करणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले.

प्लॅटफॉर्म पूर्णपणे तयार आहे, असेही त्याने स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात सरकारी मालकीच्या गोदामांचा समावेश करण्यात येणार आहे. देशभरात सरकारी मालकीची सुमारे एक हजार गोदामे आहेत. मॉडेल अॅक्टमधील तरतुदीनुसार गोदामांना शेतमाल बाजार म्हणून घोषित करता येते. सध्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि अरूणाचल प्रदेश या सहा राज्यांनी ही तरतूद लागू केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडला ; बच्चू कडू

खेड घाटातील बाह्यवळण कामे लवकर पूर्ण करा ; अमोल कोल्हेंच्या अधिकाऱ्यांना सूचना