शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; आता शेततळ्यासाठी ९५ हजार रुपये अनुदान

राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेशी सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाचे 50 हजार रुपये अनुदान आणि मनरेगातून 45 हजार असे एकूण 95 हजार रुपयांचे अनुदान शेततळे खोदाईसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.

आतापर्यंत 1 लाख 61 हजार शेततळी पूर्ण करण्यात आली असून 2 लाख 30 हजार शेततळ्यांची आखणी करुन ठेवण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावतळ्याची योजना राबविण्याचा विचारही राज्य शासन करत आहे.

गेले दोन दिवस विधानसभेत सुरू असलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. त्यांनी आपल्या उत्तरात गेल्या ५ वर्षांतील सरकारच्या कामगिरीचा आलेख मांडला. पाणी साठवण्याची व्यवस्था म्हणून १ लाख ६१ हजार शेततळी निर्माण झाली आहेत. आता शेततळ्यांसाठी रोजगार हमी योजनेतून ४५ हजार रुपये आणि राज्य सरकारकडून ५० हजार रुपये असे एकूण ९५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले.

दुष्काळात तेरावा ; खताच्या किमतीत वाढ

शेतकऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी दरमहा शंभर रूपये भरावे लागणार