जाणून घ्या, काय आहेत कापराचे घरगुती फायदे…

  • कापूर हा फक्त आपण पूजेसाठी वापरतो. पण त्या व्यतिरिक्तही या कापराचे बरेच फायदे आहेत. जर तुम्हांला भाजले असले तर कापूर किंवा कापराचे तेल लावावं. यामुळे जळजळ दूर होण्यास मदत होईल. तसेच घरात कापराचा धूर केल्याने जंतू नष्ट होतात. यामुळे आजारांचा संसर्ग होत नाही.
  • तसेच दाट दुखत असल्यास वेदना होणाऱ्या ठिकाणी कापराची पावडर ठेवल्यास त्या ठिकाणी आराम मिळतो. घरात सुगंध दरवळत राहावा यासाठी कापूर वापरावा. कापराची वडी जाळून ठेवण्याने घरामध्ये सुवास नक्कीच पसरेल.
  • पाण्यामध्ये कापराच्या तुकड्यांची पूड करून मिसळावी, आणि ते पाणी घरात सगळीकडे शिंपडाव. त्यामुळे घरामध्ये मुग्यांचा त्रास कमी होईल. याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर ढेकण्याचा त्रास होत असले तर तो कमी करण्यासाठी कापराच्या वड्या एका कापडात बांधून ते बिछान्यात ठेवावं.
  • पोटदुखी होत असेल तर ओवा आणि पुदिना यामध्ये कापराचे तीन थेंब मिसळावे आणि ते घेतल्याने पोटदुखी बंद होते. स्नायू आणि सांधे दुखत असतील तर कापराच्या तेलाने मालिश करावी. यामुळे वेदना थांबतील आणि आराम देखील लवकर मिळेल. जे त्वचेला खाज येत असले तर ज्या भागावर खाज येते तेथे कापूर लावल्याने खाज येणे बंद होईल. तसेच जर तुमचा कान दुखत असेल तर तुळशीच्या पानांच्या रसात कापूर विरघळून थोडेसे कोमात करून कानात घालावं यामुळे कान दुखी बरी होईल.

महत्वाच्या बातम्या –

कोथिंबीर १८ हजार रुपये शेकडा बाजारभावाने विक्री

चंद्रकांत पाटील यांना काहीही बोलण्याची सवय आहे- अजित पवार

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काजू आहेत फायदेशीर ; जाणून घ्या काय आहेत फायदे