इलेक्ट्रिक कारवरून नितीन गडकरी यांनी एलॉन मस्कला सुनावले

इलेक्ट्रिक कारवरून नितीन गडकरी यांनी एलॉन मस्कला सुनावले

नवी दिल्ली : २०१० दशकाच्या उत्तरार्धापासून जगात इलेकट्रीक कारने जगात आपली बाजारपेठ वासवायला सुरुवात केली. आजही आपल्याला रस्त्यावरून प्रवास करताना एकतरी इलेकट्रीक दुचाकी किंवा चारचाकी दिसतेच. पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि एकूणच प्रदूषणात होणारी असामान्य वाढ याचा विचार करून आज अनेक जण पेट्रोल- डिझेल गाड्या सोडून इलेकट्रीक दुचाकी किंवा चारचाकी वापरायला लागले आहेत. इलेकट्रीक वाहनांचा विचार करताच कोणाचं नाव डोळ्यासमोर येत तो म्हणजे एलॉन मस्क होय. एलॉन मस्क हा त्याच्या ‘टेस्ला’ या कंपनीमुळे जगभरात चर्चेत आला आहे. मात्र आता याच टेस्ला कंपनीला देशाचे महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चांगलेच फटकारले आहे.

अमेरिकेतील दिग्गज कंपनी ‘टेस्ला’ला भारतात आपल्या इलेक्ट्रिक कार विकायच्या आहेत. भारतात आपल्या इलेक्ट्रिक कारची विक्री करण्यासाठी करात सूट द्यावी अशी मागणी एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी केली होती, यावरून नितीन गडकरी चांगलेच संतापले आहेत. ” एलॉन मस्क हे त्यांच्या इलेकट्रीक कारची निर्मिती चीन या देशात करतात मात्र त्यांना त्याची विक्री भारतात करायची आहे, हे काही आमच्या पचनी पडणारे नाही अश्या शब्दात नितीन गडकरी यांनी टेस्ला कंपनीला सुनावले आहे. टेस्ला कंपनीला त्यांची इलेकट्रीक कार भारताच्या रस्त्यावर उतरवायची असेल तर प्रथमतः त्याचे उत्पादन या देशात म्हणजे भारतातच करावे लागेल असे गडकरी एका मुलाखतीत आज  म्हणाले. मस्क यांना टेस्ला इलेकट्रीक कारचे उत्पादन चीन मध्ये करायचे आहे आणि त्याची विक्री येथे भारतात करायची आहे हे काही आम्हाला केंद्र सरकारला पटत नसल्याचे गडकरी आज म्हणाले.

मी या विषयी टेस्ला कंपनीचे भारतातील प्रमुखांशी पण चर्चा केल्याचे यानिमित्त नितीन गडकरी यांनी सांगितले. देश ऑटोमोबाइल कंपनीला खूश करू शकत नाही. भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. BMW, Volvo, Mercedes-Benz, Toyota, Honda, Hyundai या जगातील ऑटोमोबाइल क्षेत्रातील दिग्गज कंपन्या भारतात आहेत. जर आपण एका कंपनीला लाभ पोहोचवला तर तो लाभ इतर कंपन्यांनाही द्यावा लागेल असेही नितीन गडकरी आज मुलाखतीत बोलताना म्हणाले.

 महत्वाच्या बातम्या :