इलेक्ट्रिक वाहनांसाठी ‘बॅटरी स्वॅपिंग धोरण’ राबवणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

इलेक्ट्रिक वाहनांसाठी 'बॅटरी स्वॅपिंग धोरण' राबवणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज बजेट सादर केले. गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनामुळे आर्थिकचक्र कोलमडले होते. त्यामुळे आजचे हे बजेट अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मोठ्या शहरात मोकळ्या जागांचा अभाव असल्याने इलेक्ट्रिक वाहनांसाठी आता चार्जिंग स्टेशन ऐवजी बॅटरी स्वॅपिंग धोरण राबवण्यात येणार आहे. (battery swapping policy to be implemented instead of charging stations) असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.

ऑटो कंपन्यांच्या मागणीचा विचार करून तसेच भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्येकवेळी म्हटले आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी इलेक्ट्रिक वाहनांसंबंधी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांविषयी धोरण जाहीर केले आहे.

शहरात मोकळ्या जागांचा अभाव असल्याने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन ऐवजी बॅटरीचे स्वॅपिंग धोरण राबवणार आहे. या घोषणेमुळे ऑटो सेक्टरला मोठा दिलासा मिळणार आहे. बऱ्याचदा इलेक्ट्रिक वाहनांमधील चार्जिंग संपल्यावर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या निर्णयामुळे आता ग्राहकांना फायदा मिळू शकणार आहे.

महत्वाच्या बातम्या: