कोविड तपासणी प्रयोगशाळेसाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करा – डॉ. राजेंद्र शिंगणे

राजेंद्र शिंगणे

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट; कामांची पाहणी

बुलडाणा – राज्य शासनाने बुलडाणा येथे आरटीपीसीआर (RT PCR ) ही कोविड आजाराचे निदान करणारी प्रयोगशाळा मंजूर केली आहे. प्रयोगशाळेमुळे जिल्ह्यातच कोविडचे निदान होणार आहे. त्यामुळे आपल्या येथील संशयित व्यक्तींना चाचणी अहवालासाठी प्रतिक्षा करावी लागणार नाही.  प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींची तातडीने पूर्तता करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे

जिल्हा स्त्री रूग्णालय अर्थात डेडीकेटेड कोविड केअर हॉस्पिटल येथे टाटा ट्रस्टच्या सहकार्यातून अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी आज पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, डॉ. भुसारी,  टाटा ट्रस्टचे श्री. लोणारे आदी उपस्थित होते.

राज्यभर वीज बिलांची होळी केली जाणार – राजू शेट्टी

टाटा ट्रस्टने लवकरात लवकर रूग्णालयाचे काम पूर्ण करून रूग्णालय प्रशासनाच्या ताब्यात देण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, कोविड रूग्णांची वाढती संख्या पाहता रूग्णालय लवकर रूग्णसेवेत रूजू करणे गरजेचे आहे. टाटा ट्रस्ट दर्जेदार काम करीत आहे. त्यामुळे एक अद्ययावत रूग्णालय जिल्हावासियांना मिळणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव संपल्यानंतर सदर रूग्णालयाचा रूग्णसेवेसाठी प्रभावी वापर करता येणार आहे. येथील प्रयोगशाळेसाठी  आवश्यक असणारे मनुष्यबळ राष्ट्रीय हेल्थ मिशन व नियमित स्टाफमधून पुरविण्यात यावे. प्रयोगशाळा लवकर सुरू करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

महत्वाच्या बातम्या –

नुकसान झालेल्या पिकांचा तत्काळ सर्वे करावा – डॉ. अशोक उईके

पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली पीक पाहणी