‘चंदन शेती’ करोडोचे उत्पन्न देणारे पीक? सत्य कि अफवा !

चंदन शेती

चंदन शेती (Sandalwood farming) कशी करावी उत्पन्न किती होईल बघुयात. जुनी म्हण आहे (चोर ज्याला नेतो तेच पीक केलं पाहिजे) पण दुर्दयवाने ज्याला चोर सुद्धा नेत नाही अशी पीक शेतकरी करत गेला. कीर्तनकार महाराज म्हणतात ”माळकरी बदमाश नाही बदमाश लोकांनी माळी घातल्या” तसेच चंदन पीक वाईट नाही चंदनाच्या काही चुकीची माहिती पसरली आहे . बघुयात चंदन शेती कुठे कुठे चांगल्या पद्धतीने घेता येते,त्याची रोपे कुठे मिळू शकतात,चांगली रोपे म्हणजे काय,त्याचे शेतात आंतर कशे लावले पाहिजे,त्याला होस्ट प्लांट कोणता दिला पाहिजे इ.

कृषी अभियासिकांच्या मते चंदनाला होस्ट लागतो त्यासाठी कडुलिंबाचाच वापर केला जातो.

शेतकरी चंदनाची (Sandalwood farming) झाडे लावतात पण ते येत नाही का?
आपण बघितले असेल किंवा जे कोणी चंदनाचे पीक अभ्यास न करता लावले तर ते फक्त २ वर्ष जगेल . तर त्यासाठी आपल्यलाला

चंदन(Sandalwood farming) पीक हे नैसर्गिक रित्या मराठवाड्यात तसेच महाराष्टात का येते त्याच मूळ कारण अशे आहे कि .मूळ कारण अशे आहे कि चंदन चांगले येण्यासाठी कडुलिंब लागतॊ . परंतु चंदनासोबत झाडाच्या बाजूला शेवगा,पेरू,हादगा सीताफळ लावले तर हे चंदनाला प्रॉपर होस्ट नाही होत ते दीर्घकाळसाठीचे होस्ट नाही होऊशकत
ते काही काळासाठी होस्ट होऊ शकेल . परंतु प्रॉपर होस्ट द्यायचा ठरल्यास “कदलिम्बाचा” वापर करावा. चंदनाच्या झाडाचे तज्ञ सांगतात चंदनाच्या झाडाला कमीत कमी पाण्याचा वापर करावा. १ व २ वर्ष पाणी द्या त्यानंतर पाणीच बंद करा. तज्ञांनी शोध लावला असा कोणता होस्ट प्लांट आहे कि स्वतः जागून चंदनाला हि जगवेल तर ‘कडुलिंब’ आहे.

पुढील काळात १०० शेतकऱ्यांपैकी ५ च शेतकरी चंदनाचे उत्पन्न घेतील असे दिसते कारण. कडुलिंब लावण्याची कोणाची हि मानसिकता नाही. प्रत्येकाचा असा गैरसमज असतो कि मी कडुलिंब लावला तर लोक मला नावे ठेवतील, हसतील. कडुलिंब हि शेतात लावण्याची गोष्ट आहे का अशे लोक म्हणतील. पण शेतकरी हा फक्त चंदन च लावतो म्हणून ते पीक २ वर्षात खराब होते.

२ झाडांच्या छंदांमध्ये आंतर किती असावे..
सोप्या पद्धतीने सांगायचे झाल्यास . एक एकर शेतातील क्षेत्रफळ हे ४३००० Sqft असते . ४३००० भागिले १० भागिले १० केल्यास उत्तर येते ४३० म्हणजेच एका एकरात १० बाय १० च्या अंतरात जर खडे केल्यास तर होतात ४३० तर त्या खड्यात १ झाड चंदन लावा १ झाड कडुलिंब ह्या पद्धतीने. म्हणजेच २१५ चंदन आणि २१५ कडुलिंब असं नियोजन करायचे.

खत काय देता येईल ?
तर चंदनाला पांढरी मूळ नाही म्हणजेच ,चंदनाला स्वतःची मूळ नाही म्हणून आपण कुठलंही खत दिल्यास ते घेणार नाही . म्हणून चंदनाला कुठल्यातरी झाडाची मुळे हे त्याच खत आहे . शेतकऱ्यांनी जर चंदन लावले असता एक महिना होऊन गेला असेल तर . त्याच्या जवळच अगदी झेंडूचे झाड लावू शकता तसेच मिरचीचे झाडे लावू . म्हणजेच त्याची मुळे खाद्य तयार करील. (हळदी , कोरपड ) वापरू शकता.
(चंदनाचे झाड लहान असताना कोरपड चा वापर करा म्हणजेच कि त्याला पाणी कमी लागते वर नंतर लॉन्ग लाईफ ते राहील)

चंदनाचे दोन जाती …
एक असते रक्तचंदन आणि दुसरे श्वेत चंदन .आल्या महाराष्टात येते तर श्वेत चंदन जे नैसर्गिक येते व जे रक्तचंदन आहे ते केरळ मध्ये येत. किंवा जिथं पहाडी एरिया आहे तिथे येते. रक्तचंदन चे फक्त लाकूड उपयोग्यात येते परंतु घेणारे कोणी नाही ते तुम्हाला भारत बाहेरच विकावे लागेल परंतु ,जे महराष्ट्रात येणारे श्वेत चंदन आहे ते छोटासा तुकडा एखाद्याला ५००रुपयाला विकू शकता व रक्तचंदनचे संपूर्ण झाड विकावे लागते.

हे पीक मुख्यतः जिथं जिथं कडुलिंब चांगला येतो, ऊन जास्त पडते , पाऊस कमी पडतो हे ठिकाण चंदनाचे उत्पादन घेण्यास चांगले ठरते.

चंदन खूप होणार नाही कारण…
पहिले कारण अशे कि चंदन हे १५ वर्षातून एकदा येते , ते बाकी पिकांसारखे दार वर्षी नाही येत . श्वेत चंदनाची हार्वेस्टिंग हि १५,२०,२५ वर्ष ह्या पद्धतीने एकदा केली जाते .अशे जर असेल तर शेतकरी उत्पादन करण्यास टाळाटाळ करतो ‘एखादाच शेतकरी ह्या मार्गाने जाईल’

चंदनाला गाभा कधी येतो ..
चंदनाला बी आल्यां नंतर गाभा तयार होण्यास सुरु होत . त्यांनतर ५ ते ६ वर्षांनी आपण विकू शकता

महत्वाच्या बातम्या –