राज्यात कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू – राजेश टोपे

कोरोना विषाणू

सव्वासात लाख नागरिक होम क्वारंटाईन

मुंबई, दि.१७: राज्यात आज २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.७ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या –

फवारणी करताना दोन शेतकऱ्यांना विषबाधा

अवकाळी पावसामुळे संत्र्याचा आंबिया बहर अडचणीत