नदीकाठच्या नुकसानीबाबत १०० टक्के नुकसान भरपाई द्या – अमित देशमुख

अमित देशमुख

लातूर – मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकंदरीत नुकसानीची व्याप्ती लक्षात घेता सरसकट मदत करण्याबाबत राज्य शासन लवकरच निर्णय घेईल अशा शब्दात पालकमंत्री अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. नदीकाठच्या नुकसानीबाबत १०० टक्के नुकसान भरपाई देण्याबाबत त्यांनी विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत.

पालकमंत्री देशमुख यांनी देवणी तालुक्यातील जवळगा येथे जाऊन अतिवृष्टी आणि मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. खरीप पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी ३० सप्टेंबर रोजी दुपारी देवणी तालुक्यातील जवळगा परिसरातील रामलिंगेश्वर मंदिरा लगतच्या पुलाची प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, सचिव अभय साळुंखे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी देवणी तालुक्यातील जवळगा परिसरातील रामलिंगेश्वर मंदिरा लगतच्या पुलाची पाहणी केली तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

महत्वाच्या बातम्या –