एकाच दिवसात १२ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंतची विक्रमी संख्या

कोरोना विषाणू

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पोहोचली तीन लाखापर्यंत, राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ६६ टक्क्यांवर

मुंबई – राज्यात आज आतापर्यंच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. आज दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ७७६० नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४२  हजार १५१  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

आज निदान झालेले ७७६० नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३०० मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७०९ (५६), ठाणे- १४२ (६), ठाणे मनपा-२२६ (७),नवी मुंबई मनपा-२५९ (७), कल्याण डोंबिवली मनपा-१०३ (६),उल्हासनगर मनपा-३९ (१), भिवंडी निजामपूर मनपा-१५ (१६) , मीरा भाईंदर मनपा-८९ (८),पालघर-१२३ (१), वसई-विरार मनपा-८६ (४), रायगड-१२९ (६), पनवेल मनपा-१०६, नाशिक-११०(४),नाशिक मनपा-३३७ (५), मालेगाव मनपा-८, अहमदनगर-२०७ (२), अहमदनगर मनपा-१२०, धुळे-१० (२), धुळे मनपा-२५ (१), जळगाव-२४९ (७), जळगाव मनपा-४१ (५), नंदूरबार-१० (२), पुणे- ३२६ (१०), पुणे मनपा-१२९६ (२९), पिंपरी चिंचवड मनपा-५८५ (१७), सोलापूर-१६३ (३), सोलापूर मनपा-३७ (१), सातारा-१६३ (१), कोल्हापूर-२०९ (२९), कोल्हापूर मनपा-३४ (४), सांगली-१०९ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४६ (३), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-५८, औरंगाबाद-१२४ (१), औरंगाबाद मनपा-९७ (१०), जालना-१, हिंगोली-३, परभणी-१८, परभणी मनपा-२४,लातूर-७५(१), लातूर मनपा-४४ (५), उस्मानाबाद-३४४ (२), बीड-५७ , नांदेड-४३ (२), नांदेड मनपा-५५ (१), अकोला-११ (२), अकोला मनपा-५ (१), अमरावती- ३ (१), अमरावती मनपा-६९, यवतमाळ-५२, बुलढाणा-८७ (१), वाशिम-६४, नागपूर-६२ (३), नागपूर मनपा-१७४ (१४), वर्धा-११ (१), गोंदिया-१७, चंद्रपूर-११, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-१२, इतर राज्य १३.

कसं असणार आहे, गृह विलगीकरण?

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २३ लाख ५२ हजार ०४७ नमुन्यांपैकी ४ लाख ५७ हजार ९५६ नमुने पॉझिटिव्ह (१९.४७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४४ हजार ४४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ९०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

महत्वाच्या बातम्या –

डाळिंब खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

कढीपत्त्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या