‘या’ जिल्ह्यात काल दिवसभरात १३६६ नवे कोरोना बाधित रुग्ण!

कोरोना

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. काल जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा रेकॉर्ड ब्रेकच निघाला. काल दिवसभरात जिल्ह्यात पहिल्यांदा १ हजार ३६६ नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३२ हजार १६३ झाला असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजार ६७७ झाली आहे. काल दिवसभरात १५ कोरोना बाधित रुग्णांचा बळी गेल्याने कोरोना बळींची संख्या ४९५ झाली आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात २६ हजार ९९१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ८३.९२ टक्के इतके आहे. जिल्ह्यात काल तब्बल ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २७५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७२० आणि अँटीजेन चाचणीत ३७१ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७०, संगमनेर ३६, राहाता ७, पाथर्डी ९, नगर ग्रामीण २१, श्रीरामपूर ०९, कॅंटोन्मेंट १६, नेवासा २६, पारनेर १९, अकोले १४, राहुरी १५, कोपरगाव १९, जामखेड ८, मिलिटरी हॉस्पिटल ३ आणि इतर जिल्हा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ७२० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, महापालिका २७२, संगमनेर १३, राहाता ७३, पाथर्डी १८, नगर ग्रामीण ८४, श्रीरामपुर ५८, कॅंटोन्मेंट ११, नेवासा ३४, श्रीगोंदे १४, पारनेर ३४, अकोले ५, राहुरी ५७, शेवगाव ९, कोपरगांव १५, जामखेड १८ आणि कर्जत ५ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत काल ३७१ जण बाधित निघाले आहेत. यामध्ये, महापालिका ३५, संगमनेर २६, राहाता ४४, पाथर्डी ३४, नगर ग्रामीण १, कॅंटोन्मेंट १०, नेवासा १७, श्रीगोंदा २४, अकोले ३९, राहुरी ३८, कोपरगाव ४१, जामखेड ३२ आणि कर्जत ३० अशा रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –