या जिल्ह्यात १९.८४ टक्के पीक कर्जवाटप

पीककर्ज

हिंगोली – जिल्ह्यातील विविध बॅंकांनी १८ जुलै पर्यंत ४२ हजार ३१० शेतकऱ्यांना २३१ कोटी ९२ लाख ७६ हजार रुपये (१९.८४ टक्के) एवढे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बॅंक आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे पीक कर्जवाटप ३५ टक्कें वाढ झाली आहे. परंतु, व्यापारी आणि खासगी बॅंकांचे कर्जवाटप अजून २० टक्केच्या आतमध्येच अडकून बसले आहे.

आरोग्यासाठी केळी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

जिल्हा बॅंकेने आजपर्यन्त २१ हजार ६८८ शेतकऱ्यांना ५३ कोटी ९० लाख ५२ हजार रुपये एवढे पीक कर्जवाटप केले आहे. व्यापारी बॅंकांना सर्वाधिक उद्दिष्ट आहे. या बॅंकानी आजपर्यन्त १२ हजार २६१ शेतकऱ्यांना १२० कोटी ४९ लाख २४ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने आजपर्यन्त ८ हजार ३६१ शेतकऱ्यांना ५७ कोटी ५३ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील मजुरांना आवाहन

राज्यात आज ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी – राजेश टोपे