कृषि आणि सिंचन क्षेत्रासाठी 2.83 लाख कोटी रूपये – निर्मला सीतारामन

कृषि आणि सिंचन

कृषी आणि सिंचनासाठी 2.83 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. विविध योजनांची घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. कृषि आणि सिंचन क्षेत्रासाठी २.८३ लाख कोटी रूपयांची तरतूद करून सीतारामन यांनी शेतकऱ्यांची मने जिंकली.

स्वच्छ भारत योजनेसाठी 12 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच किसान रेल योजना सुरू करून दूध, मांस, मासे वाहतूक करणे सुसह्य करणार अशी घोषणाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

तसेच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आलं आहे. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत करावी लागेल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी आम्ही 16 कलमी कार्यक्रम आणतो आहोत. ज्याद्वारे शेतकऱ्यांची प्रगती करणाऱ्यावर भर दिला जाईल. सौर उर्जेवर शेती पंप सुरु केले आहेत. आणखी 15 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देणार असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं.

दरम्यान, एप्रिल 2020 पर्यंत जीएसटीचं नवं व्हर्जन येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. 27 कोटी लोक दारिद्र्यरेषेबाहेर आले असंही त्यांनी यावेळी सांगितलं. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात आम्हाला यश आलं असंही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या –

फिरत्या पशू चिकित्सालयामार्फत पशूंवर पाहिजे त्या ठिकाणी उपचार करणे शक्य – महादेव जानकर

अर्थसंकल्प : सरपंचाना येणार अच्छे दिन, मानधनात वाढ करण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद

अर्थसंकल्प : कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ६,४१० कोटी रुपयांची तरतूद

अर्थसंकल्प : सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, जलसंजीवनी योजनेकरिता मोठी तरतूद