कॉंग्रेसचे आणखी दोन आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

गोव्यामध्ये काँग्रेसला आणखी 2 धक्के बसण्याची शक्यता आहे. याआधी काँग्रेसचे एकूण 4 आमदार भाजपात प्रवेश करणार होते. त्यापैकी सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी गेल्या मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. आता उर्वरित दोन आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

भाजपात प्रवेश केलेल्या दयानंद सोपटेंना गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्षपद, तर सुभाष शिरोडकर यांना गोवा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात येणार आहे. तर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या 2 काँग्रेस आमदारांनाही महामंडळाचं अध्यक्ष पद देण्यात येणार आहे.