कोरोना व्हायरसचे मुंबईत २ संशयित रुग्ण

चीनमधून करोना व्हायरसचा भारतात प्रवेश होऊ नये याकरिता देशभरातील सात विमानतळांवर चीन आणि आसपासच्या प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.

‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे दूधदरवाढीसाठी उपोषण

यात मुंबईसह, दिल्ली व कोलकाता या आंतरराष्ट्रीय विमानतळांचा समावेश आहे. मात्र, मुंबईमध्ये दोन संशयित कोरोना व्हायरस रुग्ण आढळले असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे. हे दोघे संशयित रुग्ण चीनहून मुंबईत दाखल झाले आहेत.चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक होऊन २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेने चिचंपोकळी येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.

भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याची गरज नाही – राजू शेट्टी

या व्हायरसची लागण झाल्यानंतर ताप येणे, खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे अशी लक्षणे आढळत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.