‘या’ जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी २२ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

कापूस

वर्धा – बाजारात आद्रतेच्या नावाखाली कमी दराने कापूस खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे सीसीआयच्या खरेदीकडे लागले असून त्यासाठी नोंदणीवर भर दिली गेल आहे. आजवर जिल्ह्यात २२ हजार १७५ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे.

जिल्ह्यात सोयाबीन , कपाशी, तूर अशी मोठी पिके घेतली जातात. दसरा, दिवाळीपूर्वी सोयाबीन काढणीला येत त्याची  मोठया प्रमाणात विक्री केली जाते. त्यामुळे सण-उत्सव होणाऱ्या खर्चाच्या रकमेची तरतूद या पिकातून करणे शक्य होते. त्यानंतर वार्षिक गरजांच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या पैशांची सोय म्हणून कापूस विक्रीवर शेतकऱ्यांची भिस्त राहते. सध्या काही भागात कापूस वेचणीला आला आहे. बाजारात या कापसात अधिक ओलावा असल्याचे सांगत कमी दराने त्याची खरेदी केली जात आहे. ५८५० रुपये कापसाचा हमीभाव असताना चार हजार रुपये दराने व्यापाऱ्यांकडून कापूस घेतला जात आहे. त्यामुळे पंधराशे रुपयांचे सरासरी नुकसान  शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे.

सीसीआयची खरेदी ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना आधी नोंदणी करावी लागणार आहे असे सांगण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे २२१७५ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक नऊ हजार ३८४ शेतकऱ्यांनी हिंगणघाट येथील केंद्रावर नोंदणी केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

पणन महासंघ येणार ॲपवर

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदीतील अनागोंदी टाळण्यासाठी यावेळी अॕपवर नोंदणीचा पर्याय देण्याचे नियोजन केले आहे.

महत्वाच्या बातम्या –