जायकवाडी धरणात 25 टक्के पाणीसाठा जमा – जलसंपदा विभाग

25 टक्के पाणीसाठा

नाशिक आणि अहमदनगर  धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गाचे पाणी ९६ हजार क्युसेक या वेगाने जायकवाडी धरणात दाखल होत आहे. सध्याची आवक लक्षात घेता मंळवार सकाळपर्यंत ३० टक्क्यांपर्यंत पोहचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नांदुर-मधमेश्वर वेअरमधून विसर्ग कमी करण्यात आला असून या धरणातून सोमवारी सायंकाळी १ लाख ५० हजार क्युसेक या वेगाने विसर्ग सुरू होता.

एका आठवड्यात धरणाची पाणीपातळी १५ फुटांनी वाढली आहे. सोमवार रात्रीपासून धरणात मोठ्या प्रमाणात आवक वाढणार असून धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढणार आहे. मागच्या 24 तासांत नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येतेय. परिणामी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, सोमवारी संध्याकाळी धरणात 25 टक्के पाणीसाठा जमा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

महत्वाच्या बातम्या –

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमधील गोदावरी नदी काठावर राहाणाऱ्या नागरीकांचे प्रशासनाकडून स्थलांतर

पावसामुळे तिसऱ्या यादीतील अकरावी प्रवेशांसाठी एक दिवसाची मुदतवाढ – शिक्षणमंत्री

दैवाने सत्तेवर बसवले असून विरोधकांना दैव नक्कीच शिक्षा करेल