शेतकऱ्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी 27500 मे.टन खत तुतुकोरीन बंदरावर दाखल

शेतकरी

नवी दिल्ली – फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (एफएसीटी) द्वारा आयात केलेल्या मूरिएट ऑफ पोटॅश खताची वाहतूक करणारे तिसरे जहाज सोमवारी तुतुकोरीन बंदरावर दाखल झाले. शेतकऱ्यांच्या  मागणीची पूर्तता करण्यासाठी 27500 मे.टन पोटॅश खताची आयात केली आहे.

सामान उतरवण्याचे व पोती भरण्याचे काम केले जात आहे. या खेपीसह, फॅक्टने यावर्षी आतापर्यंत 82,000 मेट्रिक टन मूरिएट ऑफ पोटाशची आयात केली आहे.एफएसीएटीचे मुख्य उत्पादन फॅक्टम फोस यासह मुरियट ऑफ पोटाश हे दक्षिण भारतातील शेतकऱ्यांचे  आवडते खत आहे.

कंपनी यावर्षी एमओपीच्या आणखी दोन ऑर्डर देण्याची योजना आखत आहे.यापूर्वी खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या  मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनीने एमओपीची दोन आणि एनपीकेची एक खेप आयात केली आहे.फॅक्ट ही देशातील सर्वात मोठ्या खतनिर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने यावर्षी खताचे उत्पादन व विपणन या बाबतीतही चांगली कामगिरी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –