राज्यात 3 ते 4 दिवस थंडीचा कडाका वाढणार; मुंबईत पारा आणखी घसरण्याची शक्यता

थंडीचा कडाका

मुंबई –  राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचा कडाका (Cold snap) जास्त आहे. मुंबईत सहसा तितकीशी थंडी नसते मात्र अवकाळी पाऊस पडल्यामुळे तापमानात कमालीची घट झाली आहे.राज्यात या महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे, ७,८,९ जानेवारीला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली आहे, त्यामुळे राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढी आहे,

पुढील ३ ते ४ दिवस राज्यात थंडीचा कडाका (Cold snap) वाढणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. राज्यातील  मुंबई भागात 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यातील नाशिक, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये  25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवल्या गेलं आहे. तर  धुळीच्या वादळाचा परिणाम देखील दिसून आला. मुंबईसोबतच राज्यातील  अनेक भागात पश्चिमी चक्रवातामुळे पुढील तीन ते चार दिवस तापमानात घट होईल असा अंदाज हवामान विभागाने दिली आहे. राज्यात मागील 24 तासापासून पावसाचं वातावरण होतं. अशातच वातावरणात गारवा देखील होता. त्यामुळे ही घट झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय.

महत्वाच्या बातम्या –