औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरवी मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये

हिरवी मिरची

औरंगाबाद – आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते.

महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्‍हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्‍वाद यामुळे मिरची हेक्‍टरी महत्‍वाचे मसाल्‍याचे पिक आहे. मिरचीचा औषधी उपयोग सुध्‍दा होतो.

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ५७ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. तसेच त्यासोबत कांद्याची ५९५ क्‍विंटल आवक झाली. तर कांद्याला ५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. तसेच टोमॅटोची ५१ क्विंटल आवक झाली. तर टोमॅटोला १२०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. बटाट्याची आवक ६०० क्विंटल तर दर २३०० चे २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. मका आवक ४५ क्विंटल तर दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

महत्वाच्या बातम्या –