’33 कोटी वृक्ष लागवड ही योजना नसून चळवळ’; सयाजी शिंदेच्या टीकेला मुनगंटीवारांचे उत्तर

मुनगंटीवार

33 कोटी वृक्ष लागवड ही योजना नसून चळवळ असल्याचं स्पष्टीकरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. त्यामुळे या पवित्र योजनेला बदनाम करुन स्वयंप्रेरणेने वृक्ष लागवड करणाऱ्यांचा हिरमोड करु नका, असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे.

अभिनेता आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी सरकारची ही योजना थोतांड असल्याची टीका केली होती. इतकंच नाही, तर लावलेली झाडं जगवण्याची कोणतीही सोय सरकारकडे नसल्याचा ठपका ठेवत मुनगंटीवारांना 5 सवाल केले होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत आज मुनगंटीवारांनी सरकारची बाजू मांडली.  वृक्षलागवडीच्या या चळवळीला थोतांड म्हटलं ते आश्चर्यजनक आहे. वृक्ष लागवडीमध्ये अनेक संस्था जुळल्या आहेत. महाराष्ट्रातील एका चांगल्या मिशनला बदनाम करण्याचं पाप आपल्या हातून झालं आहे असंही मुनगंटीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

रायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून वृक्षलागवड – रोहयोमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

जायकवाडी धरणाचे चार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु; नदी काठच्या गावांना दक्षतेचा ईशारा

सांगली पूरग्रस्त भाग; गिरीश महाजन यांचा पहिला सेल्फी व्हिडीओ, त्यानंतर पाण्यात उतरले
Loading…