जिल्ह्यात गेल्या २४ तासात नव्याने ३३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; तर ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

कोरोना

पुणे – पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात  नव्याने ३३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे जिल्ह्यातील एकूण संख्या आता ४ लाख ८५ हजार ०३५ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील १८७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७३ हजार ३१३ झाली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकाच दिवसात ७ हजार ७९१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २८ लाख १६ हजार ६७५ इतकी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या ३ हजार ००७ रुग्णांपैकी २२४ रुग्ण गंभीर तर ३७२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ७१५ इतकी झाली आहे.

तर राज्यात काल  7,302 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 7,756 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 60 लाख 16 हजार 506 इतकी झाली आहे. काल 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –