नेवासा तालुक्यातुन कर्जमाफीसाठी 58 हजार 105 शेतकऱ्यांचे अर्ज

राहुल कोळसे /नेवासा,प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच थकबाकीदार शेतकऱ्यांना यावेळी कर्जमाफी मिळणार असल्याची घोषणा महराष्ट्र शासनाने केली आहे . यावेळच्या कर्जमाफीचे वैशिष्टय म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये अनुदाप्रमाणे कर्ज माफीचा फायदा मिळणार आहे.त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कर्ज माफीसाठी अर्ज भरले होते .
यावेळी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर हाल झाले होते मात्र सर्व तांत्रिक बाबीवर मात करीत नेवसा तालुक्यातुन कर्जमाफीचे 58 हजार 105 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत . शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना अडचणी येऊ नये म्हणून स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे देखील पाहायला मिळाले. सर्वात जास्त सोनई 1हजार 732 तर  तेलकुडगाव 1हजार 257 तर जेऊरहैबती 1 हजार 155 शेतकऱ्यांनी कर्ज माफी अर्ज भरले आहेत . सर्वात कमी सुरेशनगर च्या 9 शेतकऱ्यांनी कर्ज माफीसाठी अर्ज दाखल केले आहेत.