7 Seater Car | 7 सीटर कार घ्यायचा विचार करत असाल?, तर ‘हे’ मॉडेल्स ठरू शकतात बेस्ट ऑप्शन

7 Seater Car | 7 सीटर कार घ्यायचा विचार करत असाल?, तर 'हे' मॉडेल्स ठरू शकतात बेस्ट ऑप्शन

टीम महाराष्ट्र देशा: कुटुंब मोठं असेल, तर कुठेही एकत्र जाण्यासाठी 7 सीटर कार (7 Seater Car) ची गरज भासू लागते. कारण सेव्हन सीटर कारमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र प्रवासाचा आनंद घेऊ शकटे. पण अनेकदा बजेटमुळे लोक या कार घेण्याचे टाळतात. अशा परिस्थितीत तुम्ही जर 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या 7 सीटर कारबद्दल माहिती सांगणार आहोत.

मारुती सुझुकी एर्टिगा

मारुतीची मारुती सुझुकी एर्टिगा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. या कारमध्ये माइल हायब्रीड टेक्नॉलॉजीसह 1.5L पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. त्याचबरोबर मारुती सुझुकी एर्टिगामध्ये पेट्रोल सोबत सीएनजीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. एर्टिगा मधील हे इंजिन 103PS पॉवर आणि 137 Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर ही कार सीएनजीवर 26 किमी प्रति किलो मायलेज देऊ शकते. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.41 लाख रुपये एवढी आहे.

मारुती सुझुकी इको

मारुतीची मारुती सुझुकी इको ही कार भारतीय बाजारामध्ये 5-सीटर आणि 7-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे या कारची भारतीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होते. या कारची विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही कार पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही प्रकारावर धावू शकते. ही कार सीएनजीवर कमाल 26 किमी प्रति किलो मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारच्या 5-सीटर मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.10 लाख रुपये आहे. तर, 7-सीटर मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 5.42 लाख रुपये एवढी आहे.

रेनॉल्ट ड्रायबर

रेनॉल्ट ड्रायबर ही MPV कार देशातील एक लोकप्रिय कार आहे. या कारला 1.0L 3 सिलेंडर आणि नैसर्गिक रित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 72 PS पॉवर आणि 96Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. ही कार बाजारामध्ये 6-वे अॅडजस्टेड ड्रायव्हर सीट, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम इत्यादी वैशिष्ट्यांचा उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या