हातातोंडाशी आलेला घास गेला ; एकट्या अकोला जिल्ह्यात ७४ हजार शेतकऱ्यांचे ५१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान !

farmer

अकोला : यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि पुरामुळे अकोला जिल्ह्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला असून, पीक नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सतत पाऊस आणि नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी इत्यादी खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पाऊस आणि पुरामुळे जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचा अहवाल ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडे सादर करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदयकुमार नलवडे यांनी दिली आहे.

दरम्यान, गत जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत करण्यात आले असून, जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस व पुराच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या