‘निसर्ग’च्या नुकसानीपोटी पुणे जिल्ह्याला ७६ कोटींचा निधी

चक्रिवादळ

पुणे – जून महिन्यामध्ये मोठे चक्रिवादळ आले होते. या आलेल्या चक्रिवादळाने पुणे जिल्ह्यात खूप मोठे नुकसान केले. या चक्रीवादळाचा फटका प्रामुख्याने जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील डोंगर भागात असणाऱ्या तालुक्यांना बसला होता. त्यामध्ये जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांचा समावेश होता. तसेच या  तालुक्यांमध्ये पॉलिहाऊसेस, शेडनेट, घरे, गोठ्यांसह पशुधन आणि पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते.या चक्रिवादळाच्या नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला ७६ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

तसेच या वादळात ११० कोटींचे नुकसान झाले होते त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनला ११० कोटींच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठविला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले की यामध्ये नुकसान भरपाई ही घरे, गोठ्यांची पडझड, दगावलेल्या पशुधनासाठी देण्यात येणार आहे.

शासनाकडे ११० कोटींच्या निधीचा प्रस्ताव पाठविला होता त्यामधील ७६ कोटींचा निधी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –