हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळ 8 जणांचा मृत्यू

Himachal Pradesh

हिमाचल प्रदेश राज्यामधील विविध भागात अतिवृष्टीने मनुष्यहानी झाली असून यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्हे महापूरामुळे प्रभावित झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्याच्या अनेक भागात दरड कोसळणे, ढगफुटीसारखे प्रकार घडत असल्याने 323 रस्ते आणि नॅशनल हायवे क्र. 5 वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

कुल्लू जिह्यातील रोहरू येथे भूस्खलनात एकाचा मृत्यू झाला आहे. झाड कोसळून दोन नेपाळी नागरिक तर चंबा येथे पूराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. एका घराची भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तसेच शिमल्यात आरटीओ कार्यालयाजवळ भूस्खलन होऊन तीन जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Loading...

सेच मनाली-लेह महामार्गावरही भूस्खलन झाल्याने या मार्गावरील वाहतुक प्रभावित झाली आहे. मुसळधार पावसाच्या आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव चंबा आणि कांगडा जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

मुसळधार पावसानं गोदावरीला पूर; नदीच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबांना जागा खाली करण्याच्या सूचना

पूरबाधितांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातून पाठविल्या ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू

कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१२८.४१ मिमी पावसाची नोंद

Loading...