पृथ्वीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरून जाणार धुमकेतू, यानंतर सात हजार वर्षांनी घडणार अशी घटना

पृथ्वी

पुणे – खगोलशास्त्रात विशेष रूची असणाऱ्या नागरिकांना एक दुर्मिळ अशी खगोलशास्त्रीय घटना पाहण्याची संधी मंगळवारपासून (दि.14) मिळणार आहे. खगोल शास्त्रज्ञांनी नव्याने शोधलेला ‘सी-2020 एफ3′ धूमकेतू पृथ्वीच्या अगदी जवळून पुढे सरकणार आहे. भारतीय नागरिकांना पुढील 20 दिवस धूमकेतू पाहता येणार आहे. रात्रीच्या वेळी आकाशात वायव्येकडे हा अनुभव घेता येणार आहे.

दही खाण्याचे ‘हे’ आहेत फायदेअमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासा’च्या निओवाइस इन्फ्रारेड स्पेस टेलिस्कोप’ने मार्चमध्ये या धूमकेतूचा शोध लावला आहे. सध्या हा धूमकेतू पृथ्वीपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे. तो अतिशय जवळून प्रवास करत जाणार असल्याने, उघड्या डोळ्यांनीदेखील पाहता येणार आहे, अशी माहिती भुवनेश्वर येथील पथानी समंता प्लॅनेटेरियमचे उपसंचालक सुभंदू पटनाईक यांनी दिली.

जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे

या धूमकेतूचा मध्यवर्ती भाग ज्या पदार्थांपासून बनला आहे, त्याचा संबंध आपल्या सुर्यमालेच्या उत्पत्तीच्या आधी सुमारे साडेचार कोटी वर्षे इतका सांगितला जात आहे. यानंतर असा धूमकेतू सुमारे सात हजार वर्षांनी दिसेल. त्यामुळे नागरिकांनी ही दुर्मीळ घटना अनुभवण्याची पर्वणी भारतीयांना मिळाली आहे.

जाणून घ्या दालचीनीचे हे फायदे

दरम्यान, यापूर्वी सर्वांत स्पष्ट धूमकेतू उत्तर ध्रुव भागात 1986 मध्ये दिसला होता. त्याचा शोध हॅले नावाच्या शास्त्रज्ञाने लावला होता. म्हणून तो हॅलेचा धूमकेतू’ म्हणूनही ओळखला जातो. दरम्यान, सध्या दिसत असलेला हा नवीन धूमकेतू हॅलेच्या धूमकेतूपेक्षाही अधिक स्पष्ट असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

जाणून घ्या काजू खाण्याचे हे फायदे