७ ते १३ ऑगस्ट दरम्यान ‘या’ जिल्ह्यात राहणार संचारबंदी

संचारबंदी

सोलापूर – पंढरपूर आणि शेजारील काही गावांमध्ये ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२० दरम्यान पूर्ण पणे संचारबंदी (लॉकडाऊन) लागू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या कडून देण्यात आली.

राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, ‘पंढरपूर शहरातील कोरोना प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी पूर्ण पणे संचारबंदी केली जावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार ७ ते १३ ऑगस्ट २०२० या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. संचारबंदीच्या कालावधीत पंढरपूर शहरातील मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग या परिसरात व्यापक प्रमाणावर रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात येणार आहेत. सात दिवसांत कोरोना संसर्ग रोखण्यात कितपत यश येते, याचा आढावा घेवून संचारबंदीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.

महत्वाच्या बातम्या –

कारल्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

राज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त – राजेश टोपे