‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ७९ कोटी रुपयांचे अनुदान जमा

अतिवृष्टी

सोलापूर – अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवाळीपूर्वी मदत वाटपाची घोषणा करुनही अद्यापही काही तालुक्यांत ही मदत पोचली नसल्याचे चित्र सोलापुरात दिसले आहे. जिल्ह्यासाठी २९५ कोटी रुपये आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त ७९ कोटीचे वाटप झाले असल्याचं दिसत आहे. १९ ऑक्टोबरला याचदिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन-तीन दिवसांत मदत देण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु महिना उलटला तरी ही मदत काही पोचता पोचेना, अशी स्थिती सोलापूर जिल्ह्याची झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला बसला आहे. या नुकसानीपोटी जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या २९४ कोटी रुपयांपैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ७९ कोटी रुपयांचे अनुदान जमा झाले असल्याचं सांगितलं आहे. शासनाकडून पहिल्या टप्प्यातील प्राप्त अनुदान येत्या चार दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. पण आजही उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व माळशिरस तालुक्यात या मदतीच्या वाटपाबाबत फारसे काम झालेले नाहीत.

वाटपात सुसूत्रता नाही

उत्तर सोलापूर तालुक्यात अद्याप वाटप सुरूच करण्यात आलेले नाहीत. बार्शी तालुक्यात फक्त १.४८ कोटींचे वाटप करण्यात आले आहे आणि ३९.७५ कोटींचे वाटप शिल्लक आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात चार लाख रुपयांचे वाटप केले असून, २७.४ कोटींचे वाटप करण्यात येणार आहेत. अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक २२.७४ कोटींचे वाटप करण्यात आले असून, ४.४३ कोटींचे वाटप करण्यात येणार. माढा तालुक्यात ५.२२ कोटींचे वाटप झाले असून, २५.९६ कोटींचे वाटप शिल्लक आहे. करमाळा माळशिरस, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ तालुक्यात अद्यापही वाटप सुरुच आहे.

महत्वाच्या बातम्या –