‘या’ जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ

कोरोना

बीड – जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असल्याने रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ जिल्ह्यात बघायला मिळत होती. मात्र आता कोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे. यामुळे बीडकरांना मोठा दिलासा मिळत आहे.

कोरोनाच्या विळख्यात असलेल्या बीड जिल्ह्यात शनिवारी ४ हजार २६ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यात १३३९ रुग्ण आढळले. कोरोनाबाधितांमधून १३५९ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.  मात्र १८ जणांचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.  यात कोरोना बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त दिसून आली आहे.

जिल्ह्यात शनिवारी ४ हजार २६ जणांच्या कोरोना चाचणीचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यापैकी २ हजार ६८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर १३३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ३२७ रुग्ण आढळले. अंबाजोगाई तालुक्यात २४२, आष्टी १९, धारूर ९६,गेवराई ५४, केज २१०, माजलगाव ६०, परळी १३६, पाटोदा ७४, शिरूर ६२ व वडवणी तालुक्यातील ५९ रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी १३५९ जण कोरोनामुक्त झाले.

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. आता एकूण रुग्णसंख्या ६५ हजार १५२ इतकी झाली असून आतापर्यंत ५७ हजार ४३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या सहा हजार ६३८ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जि.प.सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी.के.पिंगळे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –