कृषी क्षेत्रात होणार मोठा बदल; आता 5G नेटवर्कमुळे शेतकरी करू शकतील स्मार्ट शेती

5G नेटवर्क

भारत हा एक कृषीप्रधान देश असून बदलत्या तंत्रज्ञाना बरोबरच भारतातील शेतकरी आपली शेती पद्धती आधुनिक करत आहेत. शेतकरी स्मार्ट तंत्रज्ञान आणि हायटेक नेटवर्कद्वारे दिवसेंदिवस प्रगत होत चालले आहे. देशात नुकतेच 5G नेटवर्क लाँच झालेले असून शेतकरी सुद्धा शेतीमध्ये त्याचा वापर करू शकतात.

आज आपण भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो तर आपल्याला तिकडे तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनीही हे आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्याचे दिसून येते. कारण आता बैल आणि नांगराची जागा ट्रॅक्टरने घेतलेली आपल्याला दिसून येते. शेतकरी घरबसल्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीशी संबंधित सर्व कामे करू शकतात. अशा परिस्थितीत 5G नेटवर्कचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.

शेतकरी आणि तंत्रज्ञान

आजकाल शेती पारंपारिक पद्धती बरोबर आधुनिक पद्धतीने देखील केली जाते. शेतीत आपल्याला दररोज नवनवीन बदल होताना दिसत असतात. शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती विकसित करत आहेत.

शेतीसाठी ड्रोन आणि एआई तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. 5G नेटवर्कमुळे ड्रोनची व्याप्ती वाढवणे सोपे होईल. त्याचबरोबर एआय तंत्रज्ञानासह प्रयोगशाळा तयार केल्या जातील जिथे 5G सेन्सर च्या मदतीने शेतकरी सुरक्षित शेती करू शकतील.

5G फॉर एग्रीकल्चर मार्केटिंग

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी आणि त्याबद्दल माहिती उपलब्ध करून देण्यासाठी अनेक मोबाईल ॲप सुरू करण्यात आलेले आहे. या ॲप्सच्या मदतीने शेतकरी घरबसल्या अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतात. ज्यामध्ये बियाणांची होम डिलिव्हरी, पिकांची खरेदी विक्री इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. हे सगळे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शेतकऱ्यांना चांगला नेटवर्क स्पीड मिळतो. आणि देशात 5G नेटवर्क आल्यामुळे शेतकऱ्यांचे एग्रीकल्चर मार्केटिंग आता सोपे होईल.

हवामान अंदाजासाठी होईल 5G नेटवर्कचा उपयोग

शेती हा पूर्णपणे हवामानावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. हवामानावर आधारित कृषी सल्ला घेताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे. पण आता 5G नेटवर्कचा उपयोग करत सेन्सर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकरी अचूक हवामान अपडेट मिळवू शकतात.

महत्वाच्या बातम्या  –