देशव्यापी लॉकडाऊन लावल्यास कोरोनाची साखळी तुटेल; टास्क फोर्सचा केंद्र सरकारला सल्ला

मोदी सरकार

नवी दिल्ली – एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात लॉकडाऊन करण्याच्या चर्चांना उधान आले आहे. देशात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. कालच देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी तज्ज्ञांसोबत महत्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये ते देशात गंभीर रुप घेतलेल्या कोरोनाला कसे रोखायचे, संकटाची व्याप्ती, देशभरातील ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा, रेमडेसीवीर तुटवडा आदींबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. तसेच देशातील कोरोना योद्ध्यांच्या म्हणजेच मनुष्यबळावर देखील चर्चा करणार आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारला कोरोना व्यवस्थापनावर सल्ला देणाऱ्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी देशव्यापी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. व्हि.के. पॉल हे या टास्क फोर्सचे प्रमुख असून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भातील माहिती देतात. टास्क फोर्समध्ये एम्स आणि आयसीएमआर सारख्या संस्थांच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. देशव्यापी लॉकडाऊन लावल्यास कोरोनाची साखळी तुटेल आणि रुग्णांच्या संख्येत होणारी मोठी वाढही कमी होईलजर दररोज वाढणाऱ्या संसर्गाचा वेग असाच काम राहिला तर आरोग्य व्यवस्थेची स्थिती अधिक वाईट होऊ शकते. व्यवस्था वाढवण्यासाठीही एक मर्यादा असते. अशा परिस्थितीत आपल्याला संसर्गाची संख्या कमी करावी लागेल आणि ती साखळी तोडावी लागेल. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

मोदी कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करतील अशी शक्यता वर्तविली जात होती. यावर गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनची गरज नसल्य़ाचे म्हटले होते. परंतु दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते आकडे पाहता देशाला लॉकडाऊनची गरज असल्याचे मत अनेक तज्ञांनी यापूर्वी मांडले होते. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिस्थितीतून सावरण्यासाठी नेमका कोणता निर्णय हे पाहणे महत्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या –