पालघर – तोक्ते चक्रीवादळामुळे शेतपिकांचे, फळपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यात आला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वसई तालुक्यातील उंबरगोठण, तरीचा पाडा तसेच पालघर तालुक्यातील बहाडोली आदि गावांची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र गावीत उपस्थित होते.
तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तिन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. तसेच घरांचे नुकसान झाले असून विद्युत खांब देखील पडलेले आहेत. या सर्व नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून हा सर्व अहवाल शासन पातळीवर देण्यात येईल. शासनाच्या धोरणानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
- चांगली बातमी – राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली मोठी घट
- ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय: दि. १९ मे २०२०
- जिल्ह्यासाठी चांगली बातमी: गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत
- तोक्ते चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांस मुख्यमंत्री आज भेट देणार