स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, सांगलीत सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपा सरकार विरोधात आक्रमक झाली असून आज त्यांनी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. अत्यंत आक्रमकपणे घोषणा देत त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मोर्चादरम्यान आंदोलक व पोलीस यांच्यात झटपटी झाल्या व काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेतकऱ्यांनाच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर नसून त्यावर उपाययोजना कराव्यात नाहीतर सरकारला हे महागात पडेल आशा प्रकारे आंदोलक बोलत होते व अतिशय आक्रमक होऊन घोषणाबाजी करत होते.

शेतकरी पीक विमा बाबत लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांनाचा सात बारा कोरा करावा, द्राक्षे फळबागांना संरक्षण द्यावे यांसह अनेक मागण्या आंदोलकांनी मांडल्या, सरकारला आता जाब विचारायचा असून आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात नाहीतर याचे परिणाम वाईट होतील असा आंदोलकांचा पवित्र होता. यामुळे मोर्चा अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला त्यावेल्स पोलीस व मोर्चेकरी यांच्यात झटापटी झाल्या. त्यानंतर आंदोलकांनी परत घोषणाबाजी करत या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय यांसह अनेक घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.