1 मे रोजी श्रमदान करा : आमिर खान

पुणे- पाणी फाऊंडेशनद्वारे गावांमध्ये सुरू असलेल्या पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत शहरवासीयांनी देखील श्रमदान करावं असं आवाहन अभिनेता आमिर खान यानं केलंय. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी महाश्रमदान होणार असून दुष्काळग्रस्त गावांना प्राधान्य दिलं जाणार आहे.

पुण्यातील सिंबायोसिस महाविद्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत (शुक्रवार दि.२० एप्रिल) आमिर खान बोलत होता. योजनेत सहभागी होण्यासाठी www.jalmitra.paanifoundation.in  या वेबसाईटवर रजिस्टर करून कोणीही जलमित्र होऊ शकतो. येथे रजिस्ट्रेशन करून महाश्रमदान योजनेत सहभागी होता येणार आहे.

विद्यार्थी आणि नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील जवळच्या गावात जाऊन कमीत कमी ३ तास श्रमदान करावं असं आवाहन आमिरने केलं. पुण्यात सिंबायोसिस विद्यापीठात विद्यार्थ्यांशीही आमिरने संवाद साधला.लोकांचाही त्यांना चांगला पाठिंबा मिळालाय.