राज्यात दररोज सुमारे ४ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी – राजेश टोपे

राजेश टोपे

१ लाख  ७ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९  हजार ००७  झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख  ७ हजार ६६५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

दही खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

राज्यात कोरोनाच्या साडे तेरा लाख चाचण्या – राजेश टोपे

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ५५ टक्क्यांवर – राजेश टोपे