‘या’ ठिकाणी शेतीच्या कामांना वेग

शेतकरी

जळगाव – खानदेशात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून काही भागांचा अपवाद वगळता जोरदार किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस झालाच नाही. काही वेळ स्वच्छ सूर्यप्रकाशदेखील राहत आहे. पावसाने उघडीप दिल्याने कापूस, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शेतीकामांनादेखील वेग आला आहे.

चिंच खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

खानदेशात १० ऑगस्टनंतर अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता. यात पूर्वहंगामी कापूस, उडीद, मूग या पिकांची हानी झाली आहे. तसेच ज्वारी, सोयाबीन या पिकांनाही फटका बसू लागला होता. नंतर दोन-तीन दिवस पाऊस थांबला. पुन्हा मागील महिन्याच्या अखेरिस पाऊस सुरू झाला होता. पाच दिवसमोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता. यात पूर्वहंगामी कापसाचे २५ ते ३० टक्के नुकसान झाले. शेतकरी कापसाची स्थिती सुधारण्यासाठी फवारण्या घेत होते. परंतु, पावसामुळे फवारणीदेखील बंद करण्याची वेळ आली होती.

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज

सोमवारी (ता.३१ ऑगस्ट) अनेक भागात मोठया प्रमाणात पाऊस झाला. पण मंगळवारी (ता.१) पाऊस अपवाद वगळता आलाच नाही. बुधवारीदेखील (ता.२) सकाळपासून सूर्यप्रकाशीत वातावरण होते. वाराही सुटला होता. अधूनमधून ढग येत होते. परंतु पावसाळी वातवरण नव्हते. आर्द्रता टिकून होती. परंतु उन्हामुळे वाफसा होण्यास मदत झाली आहे.

पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती

मंगळवारी व बुधवारी ऊन असल्याने हलक्या, मध्यम जमिनीत शेतीकामांसाठी वाफसा तयार झाला. त्यात बुधवारी अनेक भागात फवारणी, तणनियंत्रणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच कांदा पिकासाठी नापेर ठेवलेल्या क्षेत्रातही पूर्वमशागतीचे काम काही शेतकऱ्यांनी उरकून घेतले. काळ्या कसदार जमिनीत मात्र वाफसा होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागणार आहेत.
पावसाने दोन दिवस उघडीप दिल्याने फवारणीची कामे मोठ्या प्रमाणात अनेक भागात सुरू झाली. कांदा, कांदेबाग केळीसाठी नापेर ठेवलेल्या क्षेत्रातही मशागत सुरू झाली.

महत्वाच्या बातम्या

बळीराजा हतबल; राज्यातील शेतकऱ्यांवर नव्या व्हायरसचं संकट

‘ही’ भाजी खाणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते, जाणून घ्या फायदे