रायगड जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पांना गती देणार – दत्तात्रय भरणे

दत्तात्रय भरणे

रायगड जिल्ह्यात सुरू असलेली जलसंधारणाची कामे गतीने पूर्ण करण्यासह भूसंपादनाच्या कारणास्तव प्रलंबित असलेली कामे मार्गी लावावीत. त्यासाठी भूसंपादनाचा आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील जलसंधारण कामांची आढावा बैठक श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. भरणे म्हणाले, जागा उपलब्ध नसल्याने भूसंपादनाअभावी थांबलेल्या प्रकरणात पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. पूर्ण झालेले मात्र कालवे अपूर्ण असलेल्या जलसंधारण विभागाच्या तलाव, प्रकल्पातून सिंचन सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिथपर्यंत कालव्याची कामे झाली असतील तिथपर्यंत पाणी सोडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे. जलसंधारण प्रकल्पांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत.

पालकमंत्री तटकरे म्हणाल्या, जलसंधारण विभागाने रायगड जिल्ह्यात 5 योजना पूर्ण केल्या आहेत. यामुळे 157 हेक्टर सिंचन क्षमता आणि 1529 स.घ.मी. पाणीसाठा निर्माण झाला आहे. शून्य ते 250 हे. सिंचन क्षमतेच्या एकूण 49 योजना प्रगती पथावर आहेत. यापैकी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली कामे कार्यारंभ आदेश देऊन तात्काळ सुरू करावीत, असे  निर्देशही तटकरे यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या –

कृषिपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री

करंजवण धरण ते मनमाड शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची मान्यता

‘कालवा फुटला तर उंदीर, धरण फुटलं तर खेकडे जबाबदार! मग मंत्रीपद का घेतलं?’

शेतकरी आत्महत्येच्या आकड्यात दिवसेन दिवस वाढ