Weather Update | टीम कृषीनामा: राज्यातील तापमानात (Temperature) सातत्याने चढउतार होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीतील पिकांवर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील वातावरण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 12, 13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमानात घट झाल्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक जाणवण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
राज्यात ‘या’ भागात थंडीचा जोर वाढणार (The force of cold will increase in ‘this’ area of the state)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update), राज्यात जळगाव, जालना, औरंगाबाद आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता आहे. लातूर आणि नांदेडमध्ये देखील किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडी गायब झाली होती. आता पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील बहुतांश भागांमध्ये थंडीचा जोर कमी अधिक होत आहे. कमाल आणि किमान तापमानांमध्ये तफावत वाढल्यामुळे पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. आज (11 फेब्रुवारी) किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर, सोमवारपासून तापमानाचा पारा पुन्हा घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) व्यक्त केला आहे.
दरम्यान, या बदलत्या हवामानाचा (Weather Update) परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. या वातावरणामुळे शेतीतील पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या वातारणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून सातत्याने केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या