शेतकऱ्यांना फसविल्यास विमा कंपनीवर कारवाई- अनिल बोंडे

अनिल बोंडे

पंतप्रधान पिक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना कोणत्याही विमा कंपनीकडून फसवण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाल्यास संबंधित विमा कंपनीवर कारवाई करून त्यांना दंड केला जाईल असा इशारा राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत बँकांकडून सहकार्य न झाल्यास जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे तात्काळ तक्रार अर्ज दाखल करावा, त्याची दखल घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.

पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना अडचणी येत असून रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत आज शेतकरी प्रतिनिधी व सर्व संबंधित घटकांची महत्त्वाची कार्यशाळा प्रथमच बोलावण्यात आली. यावेळी  केंद्र सरकारचे पीक  विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भुतानी हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या समोर सर्व अडचणी मांडलेल्या आहेत. या सर्व अडचणींचा एकत्रित गोषवारा केंद्र सरकारला तत्काळ कळविण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Budget 2019 : लहान उद्योगांसाठी ५९ मिनिटात मिळणार १ कोटी कर्ज

पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे – अजित पवार

बँक भरती परीक्षा आता मराठीतही – केंद्र सरकार