नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल – संदिपान भुमरे

रोजगार हमी योजना

औरंगाबाद – पैठण तालुक्यातील नागरिकांवर रोजगारासाठी भटकण्याची वेळ आली आहे. मात्र इथून पुढे पैठण तालुक्यात मागेल त्याला रोजगार देणार अशी माहिती रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. पैठण तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सर्कल निहाय करावयाच्या कामांच्या नियोजनाबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीत पंचायत समितीच्या सभागृहात विविध विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन भुमरे यांनी तालुक्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. तालुक्यात मागेल त्याला रोजगार हे सूत्र राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील तरुणांना रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये म्हणून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत सर्कल निहायआढावा घेण्यात आला. जो कोणी रोजगार हमीच्या कामात कुचराई करेल तसेच नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमही भुमरे यांनी दिला.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी मालपाणी, मंदार वैद्य उपजिल्हाधिकारी रोहयो, चंद्रकात शेळके तहसिलदार पैठण, अशोक भवर सभापती प.स.पैठण, कृष्णा भुमरे उप-सभापती प.स.पैठण, नंदलाल काळे उपाध्यक्ष जिल्हा दूध संघ, बालाजी नलभे, कमलाकर एडके, सोपान थोरे, बागुल गटविकास आधिकारी पं.स.पैठण, इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या –