तुम्हाला ट्रेनने प्रवास करायला आवडत असेल किंवा तुम्ही काही कामानिमित्त ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
रेल्वेकडून वेळोवेळी नियमांमध्ये बदल आणि सुधारणा केल्या जातात. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी (भारतीय रेल्वेचे नवीन नियम) याची जाणीव ठेवण्याची गरज आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांचा प्रवास सुरक्षित आणि आनंददायी करण्यासाठी रेल्वेने यापैकी काही नियम घालून दिले आहेत. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या झोपेबाबतही नियम बनवला आहे.
भारतीय रेल्वे मध्ये रात्रीच्या वेळी प्रवाशांना झोपेचा त्रास होत होता. त्यामुळे नवीन गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत
बघा कश्या आहेत गाईडलाइन्स ?
१ ) प्रवासी मोठ्याने बोलणार नाही तसेच मोबाईलवर मोठ्या आवाजात म्यूझिक ऐकणार(Will listen) नाही.
२ ) रेल्वेत नाईट लाईट वगळता इतर सर्व लाईट बंद(OFF) करावे लागतील
३ ) ग्रुपमध्ये ( फॅमिली )प्रवास करणारे प्रवासी ट्रेनमध्ये रात्री उशिरापर्यंत गप्पा(Chat late into the night) मारू शकणार नाहीत, कारण सहप्रवाशाने तक्रार केल्यास कठोर कारवाई होणार
४ ) रात्री चेकिंग स्टॉफ, आरपीएफ, इलेक्ट्रीशन, केटरिंग स्टॉफ आणि मेंटनन्स स्टॉफ शांतपणे(Quietly) काम करतील.
५ ) 60 वर्षांवरील प्रवासी(Travelers over 60 years), दिव्यांग प्रवासी आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना रेल्वे स्टाफ आवश्यकता पडल्यास तत्काळ मदत करणार आहे.
रेल्वेच्या नव्या नियमांनुसार, रेल्वेतील प्रवाशांच्या वतीने तक्रारीचे निराकरण न झाल्यास त्याची जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांची असेल. रेल्वे मंत्रालयाने सर्व विभागीय मंडळांना नियमांची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
रेल्वे प्रशाशनाने जारी केलेल्या नवीन गाईडलाइन्स प्रत्येक रेल्वे प्रवाशांसाठी नकीच खूप महत्वाच्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’
- खुशखबर! आता मजुरांना मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन, कसा करावा
- यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पडला तब्बल 3 हजा
- शाळेची घंटा वाजणार! राज्यातील ‘या’ १५ जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरू
- दररोज एक सफरचंद खाल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या