तामिळनाडुतील पर्यटकांच्या स्वागतासाठी उत्सुक – आदित्य ठाकरे

महाराष्ट्र पर्यटन

महाराष्ट्रातील पर्यटनाच्या प्रसिद्धीसाठी राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत तामिळनाडू येथे भव्य रोडशोचे आयोजन करण्यात आले. चेन्नई येथील यशस्वी रोडशोनंतर मदुराई येथेही रोड शो बी टू बी बैठका आदींचे आयोजन करुन तेथील पर्यटक आणि व्यावसायिकांचे महाराष्ट्राकडे लक्ष वेधले. या रोडशोमध्ये महाराष्ट्राचा समृद्ध पर्यटन वारसा सादर करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध कलाप्रकार सांस्कृतिक कार्यक्रम यांचे सादरीकरण करुन पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यात आले.

राज्यातील शांततापूर्ण वातावरणामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत वाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तामिळनाडुतील पर्यटकांच्या स्वागतासाठी उत्सुक – आदित्य ठाकरे

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे तेथील पर्यटन व्यावसायिक आदींशी संवाद साधला. ते म्हणाले की महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन राज्यात कला साहित्य इ. बाबतीत समृद्ध वारसा आहे. तामिळ आणि मराठी या दोन्ही भाषा श्रेष्ठ असून वर्षानुवर्षांपासून अस्तित्वात आहेत. सांस्कृतिक देवाण-घेवाणीद्वारे या दोन राज्यांमधील संबंधांना आणखी वृद्धींगत करायचे आहे. महाराष्ट्रात कला संस्कृती पर्यटन अशा विविध क्षेत्रात फार मोठे वैविध्य असून हे पाहण्यासाठी तामिळनाडुतील पर्यटकांनी महाराष्ट्रात यावे महाराष्ट्र आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहे असे आवाहन त्यांनी केले.

पुढच्या तीन दिवसात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता – अंदाज हवामानखात्याचा

महाराष्ट्र – तामिळनाडूत सांस्कृतिक बांधिलकी – पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले. त्या म्हणाल्या की महाराष्ट्र आणि तामिळनाडू दोन्ही राज्यात जुन्या काळापासून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बांधिलकी आहे. हे संबंध आणि बांधिलकी पर्यटनाच्या माध्यमातून अजून वृद्धिंगत होतील. महाराष्ट्रातील वन्यजीव जंगले कोकणातील सुंदर समुद्रकिनारे आणि भुरळ पाडणाऱ्या हिल स्टेशनला भेट देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात नक्की या असे आवाहन त्यांनी केले.

येत्या एक-दोन दिवसात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे करणार पूरग्रस्त भागाची पाहणी

पाककृती बॅकपॅकर लक्झरी पर्यटकांसाठी महाराष्ट्र आदर्श – पर्यटन संचालक

पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले महाराष्ट्राला मोठी किनारपट्टी सोबतच युनेस्को जागतिक वारसास्थळे बॉलिवूड साहसी खेळ वन्यजीव इत्यादींचा वारसा लाभला आहे. साहसी पर्यटक पाककृती पर्यटक बॅकपॅकर लक्झरी पर्यटक आणि सर्व कुटुंबियांसाठी महाराष्ट्र वर्षभर एक आदर्श पर्यटन केंद्र आहे. देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटकांना सहल आयोजकांना व पर्यटन व्यावसायिकांना राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणे पर्यटनाशी निगडीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम पारंपरिक कला- संस्कृती हस्तकला पाककृती आदींची ओळख करून देणे व त्यांच्याशी व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करून विविध राज्यातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करणे हा रोडशोचा मुख्य उद्देश आहे असे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

युतीला जागावाटपावर समसमानच जागा मिळतील- संजय राऊत

‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे दूधदरवाढीसाठी उपोषण