बुलडाणा – बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या पिंप्री खंदारे येथील शेतकरी कुटुंबातल्या राजू केंद्रे याचे नाव थेट फोर्ब्स मासिकात (Forbes Magazine) झळकून आले आहे (Forbes Magazine) लंडनमधील चेवनिंग स्कॉलरशिप वर SOAS युनिव्हर्सिटीस ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकणाऱ्या राजू केंद्रेचा फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्सच्या यादीत फोर्ब्स 30 अंडर 30 मध्ये समावेश झाला आहे. फोर्ब्स इंडियाच्या मासिकात राजू केंद्रे वर एक स्टोरीही प्रसिद्ध झाली असून लवकरच ऑनलाईन यादी प्रसिद्ध होणार आहे.
लंडनमधील विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्ती साठी निवड झाल्यानंतर राजू केंद्रे याने अनेकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. राजू हा एकलव्य इंडियाच्या माध्यमातून करिअर विषयी मार्गदर्शन ही करतो. आता त्याचे नाव फोर्ब्स मासिकात झळकून आल्याने बुलढाणा जिल्ह्यासह गावातील सर्वच जणांचा अभिमानाने ऊर भरून आला आहे.
अनपेक्षित! 🏆
पहिल्या पिढीतील शिकणारं, जिल्हा परिषदेच लेकरू, मुक्त विद्यापीठात पदवी घेतलेलं, भटक्या समाजातील शेतकऱ्याच हे पोरगं जागतिक कीर्तीच्या फोर्ब्स मासिकाच्या 'Forbes 30 Under 30' यादीत आलंय.आता येत्या दशकात तळागाळातील जागतिक स्कॉलर घडतील ह्यासाठी मोहीम आखुयात. pic.twitter.com/TUD6T30TX6
— Raju Kendre (@RajuKendree) February 7, 2022
दरम्यान यादीत नाव आल्यानंतर राजू केंद्रे याने ट्वीट करत म्हटले आहे की, “पहिल्या पिढीतील शिकणारं, जिल्हा परिषदेच लेकरू, मुक्त विद्यापीठात पदवी घेतलेलं, भटक्या समाजातील शेतकऱ्याच हे पोरगं जागतिक कीर्तीच्या फोर्ब्स मासिकाच्या ‘Forbes 30 Under 30’ यादीत आलंय. आता येत्या दशकात तळागाळातील जागतिक स्कॉलर घडतील ह्यासाठी मोहीम आखुयात.”
महत्वाच्या बातम्या –
- राज्य शासनाचा मोठा निर्णय – आता सातबारा उतारा बंद करुन केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरु ठेवणार
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – पीएम किसान योजनेच्या नियमात मोठा बदल; आता ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केली तरच मिळणार पैसे…
- लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
- राज्यात आज सार्वजनिक सुट्टी जाहीर
- राज्यात गारठा कमी होणार, उन्हाचा चटका वाढणार
- अपघातग्रस्तांवर वेळीच प्रथमाेपचार करुन जीव वाचविणारे खरे देवदूत – अनिल परब