सोलापूर जिल्ह्यातील मौजे मोडनिंब, माढ्याला नव्याने एमआयडीसी – आदिती तटकरे

आदिती तटकरे

सोलापूर जिल्ह्यातील मौजे मोडनिंब, करमाळा, केम व माढा या ठिकाणी नव्याने एमआयडीसी निर्माण झाल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होईल. यासाठी मौजे मोडनिंब व माढा येथे एमआयडीसी निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करा, असे निर्देश  उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काल मंत्रालयात  आयोजित बैठकीत दिले.

आता मुख्यमंत्री करणार कोल्हापूरच्या महापुराची पाहणी

औद्योगिक क्षेत्रासाठी पाणीपुरवठा तसेच इन्फ्रास्ट्रक्चर रेट गृहित धरून याबाबत प्रस्ताव शासनास सादर करावा, असेही यावेळी कुमारी तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

आता वाढणार साखरेचे उत्पादन; महाराष्ट्र विकसित करत आहे ऊसाची नवी जात

यावेळी आमदार बबनराव शिंदे संजय शिंदे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपअभियंता सुनिल चि. कोलप,भूसंपादनचे महाव्यवस्थापक गोपीनाथ ठोंबरे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमधील गोदावरी नदी काठावर राहाणाऱ्या नागरीकांचे प्रशासनाकडून स्थलांतर

खडकवासला साखळीतील चारही धरणातील पाणीसाठा २५ अब्ज घन फुटांवर