पुण्यात मिळत आहे भेसळ युक्त पनीर

पुणे शहरात 45 व्यावसायिकांकडून 24 लाख 64 हजार रुपयांचे पनीर आणि खवा जप्त करण्यात आला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली. पनीर आणि खव्याचे नमुने तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे सुरेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

पीक कापणी प्रयोगातल्या त्रुटींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई – सहकार मंत्री

कर्नाटकातून आलेल्या पनीरची शहरातील विक्री होत असल्याची माहिती पुढे आली होती. त्या आधारावर 39 अन्नविक्रीच्या ठिकाणांवर छापे टाकून तेथील पनीरचे नमुने तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. या दुकानांमधून 15 लाख 49 हजार 990 रुपये किमतीचे सात हजार 519 किलो पनीर जप्त केले. हे पनीर कमी प्रतीचे असल्याचा संशय वक्त करण्यात येत आहे.

कृषीमंत्र्यांनी नागपुरी संत्रा व मोसंबी उत्पादकांना न्याय द्यावा – अनिल देशमुख

शहरातील सहा दुकानांमधून विक्रीसाठी आणलेला चार हजार 574 किलो खवा भेसळीच्या संशयावरून जप्त केला असून, त्याची बाजारातील किंमत 9 लाख 14 हजार 800 रुपये आहे, असेहीसुरेश देशमुख यांनी स्पष्ट केले.