विश्रांतीनंतर पावसाचा जोर उद्यापासून पुन्हा पाहायला मिळणार – हवामान विभाग

पाऊस

गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने दांडी मारलेली होती. परंतु आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

राज्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला होता. मात्र सध्या पावसाने उघडीप घेतलेली आहे. परंतु आता पावसाचा जोर हा उद्यापासून पुन्हा पाहायला मिळणार आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज, हवामान विभागाने वर्तविला आहे. पाऊस पडण्याची आवश्यक स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पाऊस विश्रांतीनंतर पुन्हा बरसणार आहे.

दरम्यान, राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला असला तरी मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये अजिबातच पाऊस झालेला नाही त्यामुळे या भागातील नागरिकांना अद्याप पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे उद्यापासून या भागांमधेही पाऊस पडेल अशी शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यात काँग्रेसच्या वाट्याला 106 तर राष्ट्रवादीकडे 95 जागा

कर्जबाजारीपणाला कंटाळून जालन्यात शेतकऱ्याची आत्महत्या
Loading…